नाशिक: माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यासह ४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अद्वय हिरेंच्या पाठोपाठ त्यांचे मोठे बंधू माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.

नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत १० लाखांची फसवणूक केल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

हिरे यांच्याबरोबरच कल्पेश बोरसे, दिपक चव्हाण, अमर रामराजे यांच्या विरोधात उपनगर पोलिस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या फसवणूक प्रकरणी उत्तम चौधरी यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीत पंचवटी कॅालेजमध्ये नोकरी लावून देण्याचे सांगून १० लाख रुपये घेतल्याचे म्हटले आहे. या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थिंक फसवणूक प्रकरणात ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना याअगोदरच अटक झालेली आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावणी होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता.

काल तो मालेगाव न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे एकीकडे अद्वय हिरेंच्या अडचणीत वाढ झालेली असतांना दुसरीकडे अपूर्व हिरे यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे. (उपनगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०४४०/२०२३)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790