नाशिक महापालिकेने ठेकेदाराला दिले ५६ लाख; रात्री ८ वाजता सिटी लिंक बसेस सुरू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): बोनससह वेतनाची मागणी करत सिटी लिंकच्या वाहकांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशीही अर्थात गुरुवारी (दि. २४) दिवसभर बससेवा पूर्णपणे ठप्पच होती. सायंकाळी मात्र पालिकेने ठेकेदाराला वेतनापोटी ५६ लाख रुपये आगाऊ रक्कम अदा केल्यानंतर रात्री ८ वाजता सिटी लिंकची सेवा सुरू झाली.

सुरुवातीला पाथर्डी गावाजवळ सुरू असलेल्या शिवमहापुराण कथास्थळी २० बसेस सुरू करण्यात आल्या. शुक्रवारी सिटी लिंक सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे सिटी लिंकचे व्ययवस्थापक मिलिंद बंड यांनी सांगितले. दोन दिवसांच्या या संपामुळे मात्र २९६० फेऱ्या रद्द होत पालिकेला ५० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

गेल्या दोन वर्षांत सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी सहा संप केले. बुधवारीही पहाटे अचानक संप पुकारल्याने विद्यार्थी, कामगारासह सर्वसामान्य प्रवाशांना फटका बसला अशीच परिस्थिती गुरुवारही होती.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत तपोवन डेपोचे गेट उघडले जाणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने एकही बस बाहेर पडली नाही. जोपर्यंत पैसे खात्यावर जमा होणार नाही तेव्हापर्यंत संप कामय ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम होते. अखेरीस पालिकेने विशेष बाब म्हणून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी ठेकेदाराला ५६ लाख रुपये गुरुवारी अदा करत तत्काळ बस सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर रात्री आठ वाजता आधी श्री शिवमहापुराण कथास्थळाकडे २० बस सोडण्यात आल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सिटी लिंक सेवा मार्गावर आली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

तर ठेकेदारावर कारवाई:
सिटी लिंक कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी विशेष बाब म्हणून पालिकेकडून ५६ लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी संप मागे घेण्यात आला. यानंतर मात्र कर्मचाऱ्यांचा संप झाला तर संबंधीत ठेकेदाराचा ठेकाच रद्द केला जाणार आहे. – मिलिंद बंड, व्यवस्थापक, सिटी लिंक

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here