Breaking: नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंची बदली; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त होते. मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: कला, साहित्य क्षेत्राने जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा- आयुक्त शेखर सिंह

अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच बदली:
अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिकचे पोलीस आयुक्तायलाची जबाबदारी 13 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आली होती. त्या आधीचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची नऊ महिन्यातच बदली करण्यात आली होती. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात ते अपयशी ठरत असल्याने त्यांची बदली करून त्या ठिकाणी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अंकुश शिंदे यांनी या आधी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी पार पाडल्यान ते नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालतील अशी अपेक्षा होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: शिक्षकांकडून मागितली दोन लाखांची लाच; उपशिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज प्रकरणी निर्बंध घालण्यात पोलिसांना आलेल्या अपयशानंतर आता अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच पुन्हा बदली करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790