नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक – मुंबई महामार्गावर स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने वाडिव-हे येथील व्हीटीसी फाट्याजवळ स्विफ्ट कारचा अपघात झाला. ही गाडी नाशिकहून मुंबईकडे जात असतांना दुभाजकावर धडकली. या अपघातात तीन ते चार जण होते. मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
तर दुसरा अपघात मुंबई- आग्रा महामार्ग वर आठवा मैल जीत ढाब्या जवळ झाला. यात ट्रक चालक जखमी झाला. रविवारी रात्री २.१५ वाजता नाशिकहून मुंबई कडे जात असतांना अज्ञात वाहनाने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटयावरील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका अपघात स्थळी पोहोचली. त्यानंतर जखमी वाहनचालकास नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक दिलेल्या ट्रकचा क्रं NL.01.AA.2774 असून यात वाहनचालक नदीम खान (४८) रा. पटोदी हरियाणा हे जखमी झाले आहे.