नाशिक: खरेदीला गर्दी; आर.के.चा काही भाग व मेनरोडला रात्री ११ पर्यंत वाहनबंदी !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): दिवाळीसाठी खरेदीकरिता बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रविवार कारंजाच्या काही भागात बॅरिकेडिंग लावून वाहनांना बंदी करण्यात आली आहे.

तसेच मेनरोड ते दिल्ली दरवाजा, नेपाळी कॉर्नर ते भद्रकाली मंदिर परिसरात सर्व वाहनांना रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, नेपाळी कॉर्नर, बादशाही पॉइंट, गाडगे महाराज पुतळा येथे बॅरिकेडिंग लावण्यात आले असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजाकडे, दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉइंट, रोकडोबा मैदान ते साक्षी गणपती, बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते मेनरोड मार्ग धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉइंट मेनरोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकाराच्या वाहतूकीला सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

पर्यायी मार्ग:
वरील मार्गावरील वाहने मालेगाव स्टॅण्ड, मखमलाबादनाका, रामवाडी, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्स, गंगापूरनाकामार्गे इतरत्र जातील. सीबीएस शालिमारकडून जुने नाशिक परिसरात जाण्या-येण्याकरिता शालिमार, खडकाळी. सिग्नल दूधबाजार मार्गाचा वापर करतील.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

पार्किंग ठिकाणे:
गोदाघाट, गाडगेमहाराज पुलाखाली, सागरमल मोदी विद्यालय, कालिदास कलामंदिरसमोर

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790