500 हून अधिक साईट विझीटचे आगामी दोन दिवसात नियोजन

नाशिक (प्रतिनिधी): बांधकाम उद्योगातील महत्त्वपूर्ण अश्या बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी शासकीय योजना असून त्या राबविण्यासाठी क्रेडाई सहकार्य करत आहे ,अश्या सर्व योजनांचा लाभ कामगारांना मिळावा या साठी हे स्मार्ट कार्ड उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन नाशिक चे पालक मंत्री दादा भुसे यांनी केले. क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारा आयोजित प्रॉपर्टी एक्सपोला आज पालकमंत्र्यांनी भेट दिली त्या प्रसंगी झालेल्या कामगारांसाठीच्या स्मार्ट कार्ड वितरण समारंभात ते बोलत होते.
या वेळी मंचावर कामगार उपायुक्त विकास माळी, सहायक कामगार आयुक्त शर्वरी पोटे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, राजू अण्णा लवटे, क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, समन्वयक अंजन भलोदिया हे उपस्थित होते.
पालकमंत्री दादासाहेब भुसे पुढे म्हणाले की नाशिक हून सुरुवात झालेल्या क्रेडाई संस्थेचे कार्य आज देशभरात पसरले आहे. शहराच्या विकासात क्रेडाई ची मोलाची भूमिका असून अनेक समजोप्योगी उपक्रम देखील क्रेडाई तर्फे राबविण्यात येत असल्याचे पण त्यांनी नमूद केले.
क्रेडाई नाशिक मेट्रो द्वारा बांधकाम कामगारांसाठी घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती या वेळी सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो 2023 हा खऱ्या अर्थाने नाशिककर तसेच नाशिकच्या बाहेरून आलेल्यान असंख्य नागरिकाना घराच्या तसेच रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी एकच छताखाली उपलब्ध करून देत असल्याचे चित्र प्रदर्शन स्थळी दिसत असून नाशिक शिवाय जळगाव, धुळे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे अश्या शहरातून प्रदर्शन बघण्यासाठी तसेच प्रगतिशील नाशिक मध्ये गुंतवणूक करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने आले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली.
गुरुवारी उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनाचा हा दुसरा दिवस अनेक अर्थाने उपयुक्त होता .80 स्टॉल वरील 300 हून अधिक पर्यायामधून निवड करण्यासाठी शनिवार व रविवार या सुट्टीचे औचित्य साधून साईट विजिट चे नियोजन अनेक ग्राहकांनी केलेले आहे.
आज दुसऱ्या दिवशी सुमारे 7000 नागरिकांनी भेट दिली व दोन दिवसात सुमारे ९७ फ्लॅट्सची नोंदणी करण्यात आली.
प्रदर्शन च्या निमित्ताने अनेक आकर्षक व ग्राहकाभिमुख योजना येथे ऊपलब्ध आहेत. प्रदर्शनात असणाऱ्या विविध पर्याय जसे टाउनशिप, बंगलो, औद्योगिक प्लॉट , फार्म हाऊस, ऑफिसेस , बजेट घरे, प्रीमियम घरे याला चांगली मागणी असल्याचे समन्वयक अंजन भालोदीया म्हणाले.
कार्यक्रमाचे आभार सहसचिव अनिल आहेर यांनी मानले. प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष दिपक बागड, सुजॉय गुप्ता, जयंत भातंब्रेकर, नरेश कारडा, खजिनदार हितेश पोद्दार, सहसचिव सचिन बागड,, मनेजिंग कमिटी मेंबर मनोज खिंवसरा, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा हे प्रयत्नशील आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790