नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक: ड्रग्ज माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीसांनी मोठी कारवाई नाशिकमध्ये केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखानामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतून गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. सचिन वाघच्या तपासात ही माहिती उघडकीस आल्यानंतर मुबंई पोलीस सचिन वाघसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. पोलिसांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथक दाखल झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेले शोधकार्य आतापर्यंत सुरू आहे.
तब्बल 15 किलो MD ड्रग्ज हस्तगत:
आतापर्यंत दोन गोण्या सुमारे 50 किलो ड्रग्ज नदी पात्रात फेकल्याच सचिन वाघ ने पोलिसांना तपासादरम्यान सांगितल्याची माहिती आहे. कमेराच्या माध्यमातून ड्रग्जचा शोध घेण्यात आला, मात्र पाणी साधारण 15 ते 20 फूट खोल असल्यानं ड्रग्जचा साठा अद्याप बाहेर काढण्याच काम सुरू आहे. तर जवळच असणाऱ्या सरस्वतीवाडी भागातून 15 किलो MD ड्रग्ज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोट्यवधी रुपयांच ड्रग नष्ट करण्याचा प्रयत्न सचिन वाघ याने केला होता मात्र मुबंई पोलिसांनी त्याचा छडा लावला आहे.
सचिन वाघ 27 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांच्या कोठडीत:
सध्या ललित पाटील आणि सचिन वाघ 27 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी साथीदार ड्रायव्हर सचिन वाघ याने मदत केली होती. ललित पाटील यांच्या सांगण्यावरून सचिन वाघने ड्रग्ज लपवले किंवा त्याचे विल्हेवाट लावली आहे, असा पोलिसांना संशय आहे.