Amazon

नाशिक: अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ‘इतक्या’ लाखाचा गुटखा जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई करत एकाच मालकाच्या दोन ठिकाणाहून १ लाख १८ हजाराचा गुटखा जप्त केला आहे.

या कारवाईबाबत या विभागाने दिलेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी ९ वाजता संदीप मुसळे, मालक मे. शिवम ट्रेडर्स, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक येथे धाड टाकली असता सदर ठिकाणी रजनीगंधा पानमसाला, जाफराणी जर्दा, विमल पानमसाला, व्ही १ सुगंधित पानमसाला इ. प्रतिबंधित पदार्थाचा २२ हजार ४१४ रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९ व २० सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन; नाव नोंदणीची संधी

कायदयाअंतर्गत तरतुदीनुसार जप्त करून ताब्यात घेतल्यानंतर त्यांचेच मालकीचे मोगलनगर मधील श्री जोगेश्वरी अपार्टमेंटसमोर, मोगल मळा, मोगलनगर, सिडको, नाशिक येथील गोदामाचा तपास केला असता तेथेही रजनीगंधा पानमसाला, जाफराणी जर्दा, विमल पानमसाला, व्ही 1 सदरचा साठा सुगंधित पानमसाला, राजनिवास पानमसाला, रॉयल ७१७ सुगंधित तंबाखु, हिरा पानमसाला इ. प्रतिबंधित पदार्थाचा ९५ हजार ६१६ रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

सदरचा एकूण १ लाख १८ हजार ३० रुपये किंमतीचा साठा अन्न सुरक्षा व मानके कायदयाअंतर्गत तरतुदीनुसार जप्त करून ताब्यात घेतला व सदरची दोन्हीही ठिकाणे सिल करण्यात आली आहेत. वरील दोन्ही प्रकरणी संदीप मुसळे, मालक, मे. शिवम ट्रेडर्स, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक यांचेविरुध्द अंबड पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम ३२८ व अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरु आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर जाहिरातींना अडसर ठरतात म्हणून ५५ झाडे तोडली; सहा जणांना अटक

दरम्यान ही कारवाई सहआयुक्त न भा, नारागुडे, सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप आणि सी. लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. पाटील, अ. उ. रासकर आणि अविनाश दाभाडे, यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790