नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग; गंगापूरसह ‘या’ धरणांमधून विसर्ग सुरु

नाशिक (प्रतिनिधी): पावसाची आतुरतेने वाट बघणार्‍या नाशिककरांवर शुक्रवारी सायंकाळी पावसाने बरसात केली. ढगांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे…

शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. सहाच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

गंगापूर धरणातून सायंकाळी ७ वाजता 1136 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. नऊ वाजता गंगापूर धरणातून २१८२ने विसर्ग वाढवून तो एकूण ३३१८ क्युसेस करण्यात येणार आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून 5 वाजता 4035 क्यूसेसने विसर्ग सुरु होता. सायंकाळी 6 वाजता 3155 क्यूसेसने विसर्ग वाढवून एकूण 7190 क्यूसेस करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

कडवा धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असल्यामुळे कडवा धरणातून संध्याकाळी 7 वाजता एकूण 212 Cusecs ने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

करंजवण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज रात्री ९ वाजता धरणातून कादवा नदी मध्ये ३०१ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पालखेड धरणातून सध्या २१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
UPDATE: गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असल्यामुळे गंगापूर धरण पूर विसर्ग दिनांक 22/09/2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता एकूण 1136 Cusecs ने सोडण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790