नाशिक: पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवून ३ लाख रुपयांना गंडा

नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाइन पार्टटाइम जॉबमधून आर्थिक फायदा कमविण्याचे आमिष दाखवून एका खासगी नोकरदाराला तब्बल ३ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

रवींद्र पांडुरंग डोंगरे (रा. संत जनार्दन स्वामीनगर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना ८ ते १६ ऑगस्ट कालावधीत वेबसाइट आणि फोनद्वारे संशयितांनी संपर्क साधला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नाशिक शहर कार्यक्षेत्रात 29 मार्चपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

पार्टटाइम स्वरूपात व्यवसाय केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचेही आमिष संशयितांनी दाखविले होते. त्यासाठी गुंतवणूक व भांडवल म्हणून टप्प्याटप्प्याने ३ लाख ५ हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले.

मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू झाला नाही. किंबहुना गुंतविलेल्या पैसेही परत न मिळाल्याने डोंगरे यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एसटी ‘हिरकणी’ बसला आग; १५ प्रवासी सुखरूप

त्यांच्या तक्रार अर्जावरून सायबर पोलिसांनी बँक खाते क्रमांक, यूपीआय आयडी आणि टेलिग्राम आयडीवरील संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्याकडे पुढील तपास देण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790