Amazon

नाशिक: शिपायाकडून ५० हजारांची लाच घेतांना लिपिक एसीबीच्या जाळ्यात !

नाशिक (प्रतिनिधी): शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक दिगंबर अर्जुन साळवे (वय ५५, रा. टाकळी) याला ५० हजारांची लाच घेताना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

साळवे हा कनिष्ठ कर्मचारी असल्याने तो कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून ही लाच घेत होता, हे चौकशीअंतीच पुढे येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

नाशिक शहरातील एका खासगी शाळेत कार्यरत असलेल्या शिपायाचे वेतन सुरू होण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ आयडी मिळावा, यासाठीचा प्रस्ताव शाळेमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेला होता.

या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी कनिष्ठ लिपिक दिगंबर साळवे याने तक्रारदार शिपायाकडे पन्नास हजारांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना साळवे जाळ्यात अडकला. या लाचखोरीच्या प्रकारामुळे नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालातील भ्रष्ट कारभार उघड झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

शहरातील एका खासगी शाळेत कार्यरत असलेल्या शिपायाचे वेतन सुरू होण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ आयडी मिळावा, यासाठीचा प्रस्ताव शाळेमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेला होता. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी कनिष्ठ लिपिक दिगंबर साळवे याने तक्रारदार शिपायाकडे ५० हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात लावलेल्या सापळ्यात ही लाच स्वीकारताना साळवे सापडला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790