नाशिकमध्ये ट्रकच्या धडकेत एक ठार

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील आंबेडकर ट्रक टर्मिनल भागात भरधाव मालट्रकने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद नूर हसन (रा.कोमटेगल्ली,गुरूद्वाराजवळ पंचवटी) असे मृत इसमाचे नाव आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून मालट्रक चालकास अटक करण्यात आली आहे.

हसन हे रविवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास आडगाव येथील ट्रक टर्मिनल भागात रस्त्याच्या कडेला उभे असतांना हा अपघात झाला.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

ट्रक टर्मिनलच्या दिशेने भरधाव जाणा-या मालट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून चालक भिमसिंग रामसिंग पाटील (रा.पार्वती कॉर्नर,कमलनगर हिरावाडी) यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790