नाशिक: लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगरकडे सापडली ‘एवढी’ बेहिशोबी संपत्ती…

नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेची लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर हिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

नंतर शिक्षण विभागाने तिला निलंबित केले. त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) धनगरच्या संपतीची चौकशी सुरू होती. त्याचा अहवाल आता आला आहे. याद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, धनगरकडे अधिकृत स्त्रोतांपेक्षा तब्बल ६४ टक्के अधिक बेहिशोबी संपत्ती सापडली आहे

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर धनगर हिच्या मालमत्तेची उघड चौकशी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे सुरू होती. सदर उघड चौकशीमध्ये धनगर हिने 15/06/2010 ते दिनांक 03/06/2023 रोजी दरम्यानच्या कालावधीत शासकीय सेवेत लोकसेवक म्हणून कार्य केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

याच कार्यकाळात लाचखोर धनगर हिच्याकडे कायदेशीर ज्ञात स्त्रोतापेक्षा अधिक तब्बल ९६ लाख ४३ हजार ८०९ रुपये एवढी अपसंपदा जमा केल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच केवळ १३ वर्षात लाचखोर धनगर हिने अधिकृत स्त्रोतांव्यतिरीक्त तब्बल ६४ टक्के अधिक अपसंपदा जमविली.

याची दखल घेत एसीबीने तक्रार दिली आहे. त्यानुसार धनगर हिच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयम १९८८ चे कलम १३ (१) (ब ) / १३ ( २ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे येथे हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारने विधिमंडळात केलेल्या घोषणेनुसार, लाचखोर धनगर हिची अंमलबजावणी संचालनाकडूनही (ईडी) चौकशी केली जाणार आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here