नाशिक: मोठ्या नफ्याच्या आमिषाने ६ लाखाला गंडा

नाशिक (प्रतिनिधी): सहा लाखास गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी राहूल बापू पाटील (रा. पोकार कॉलनी, दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. वेगवेगळया बँक खात्यात ही रक्कम भरण्यास भाग पाडून हा गंडा घालण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 30 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी !

२३ जुलै रोजी ९६६९४९६२२८ या मोबाईल धारकाने पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. अल्गो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे संबधितांनी आमिष दाखविल्याने पाटील त्याच्या भुलथापांना बळी पडले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

७४१५०१०२५१ या व्हॉटसअपवरून भामट्याने त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत एचडीएफसी आणि युनिटन बँक खात्यावर त्यांना पैसे टाकण्यास भाग पाडले. ३ ऑगस्ट दरम्यान पाटील यांनी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यांवर ५ लाख ७३ हजार ३५० रूपयांची रक्कम भरली. मात्र त्यानंतर संशयिताने ट्रेंडीगच्या माध्यमातून शेअरमार्केट मध्ये गुंतवणुक न करताच परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आल्याने पाटील यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here