नाशिक (प्रतिनिधी): सिडकाेतील गुन्हेगारी राेखण्यासाठी एकीकडे पाेलिस आयुक्तांनी २५ पाेलिसांचे गुडाविराेधी पथक सिडकाेत तैनात केले. या पथकाने सिडकाेतील रस्त्यांवर शुक्रवारी (दि. २५) सायंकाळनंतर रात्रीपर्यंत गस्तही घातली.
पाेलिसांची पाठ फिरताच शिवाजी चाैकात संदीप आठवले याचा दाेन दिवसांपूर्वी खून झाला हाेता त्या परिसराच्या जवळच गुंडांनी तब्बल १५ वाहनांची ताेडफाेड करत पाेलिसांच्या गुंडाविराेधी पथकाला आव्हानच दिले.
दरम्यान, या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज चाैक परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चाैक, अचानक चाैक, साईबाबा मंदिराच्या मागील बाजूला गुंडांनी दहशत माजवत वाहनांवर दगडफेक करत काचा फाेडल्या.
शुक्रवारी रात्री ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान ३ ते ४ गुंडांनी परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यात ३ ते ४ कारच्या काचा फोडण्यात आल्या. तर दुचाकी रस्त्यात ढकलून त्यांचीही तोडफोड करण्यात आली.
काही नागरिकांनी या गुंडांना हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार १२ ते १५ वाहनांची तोडफोड करण्यात आलीआहे. रात्री उशीरापर्यंत पाेलिस गुंडांचा शाेध घेत हाेते.
सिडकाेत गुन्हेगारीवर उपाय आता २५ पोलिसांचे गुंडाविराेधी पथक:
अंबड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसांत सहा खुनाच्या घटनांनी सिडकाे, अंबड, चुंचाळे परिसरहादरला आहे. या गुन्ह्यांच्या मालिकेनेनाशिककरांमध्ये भीती पसरली आहे. तसेच पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असल्याने आता पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीने गुन्हेगारी माेडित काढण्यासाठी २५स्वतंत्र पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गुंडविराेधीपथक सिडकाेत नियुक्त केले आहे.
सहायक पाेलिस आयुक्त शेखर देशमुख यांना देखील अंबड पाेलिस ठाण्याच्या आवारातच तळ ठाेकण्याचे व त्यांचेकार्यालय शरणपूरराेड येथून अंबडलाच हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिडकाेतील शिवाजीचाैकात भरदिवसा गुरूवारी (दि. २४) संदीपआठवलेयाच्यावर दुचाकीवरून आलेल्या टाेळक्याने खून केला. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटताच पेलिस यंत्रणेनेही तत्परता दाखवित या गुन्ह्यातील सहा संशयितांना अटक केली. तर तिघा विधीसंर्घषीत बालकांना ताब्यात घेण्यात आले. तर टाेळक्यावर माेक्कान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या १५ दिवसात अंबड पाेलिस ठाण्याच्या हद्दीत सहा खूनाच्या घडल्याने पाेलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चारच दिवसांपुर्वी मयूर दातीर या युवकाचा भरदिवसा भाेसकून खून केल्याचा प्रकार घडला. यामध्ये संशयित करण कडूस्कर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विराेधात पाेलिस तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने रहिवाशांनी थेट पाेलिस ठाण्यावरच माेर्चा काढला हाेता.
पाेलिसांनी दातीर खूनातील संशयित कडूस्कर व आठवलेच्या मारेकऱ्यांविराेधात माेक्का लावण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता गुन्हेगारी राेखण्यसाठी खुद्द पेालिस आयुक्त अंकुश शिंदे, उपआयुक्त माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.