नाशिक: हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई-नाशिक महामार्गवरील इगतपुरी हिल्स हॉटेलमधील कर्मचाऱ्याने शनिवारी (ता. १९) रात्री सव्वाआठच्या सुमारास रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

आनंदा निवृत्ती दोंदे (वय २४, रा. टिटोली, ता. इगतपुरी), असे मृताचे नाव आहे.

आनंदा याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मृताचा भाऊ सतीश दोंदे व नातेवाइकांनी केली आहे. आत्महत्येपूर्वी आनंदा याने ‘माझ्या जिवाला धोका आहे’, असा मेसेज नातेवाईक, पत्नी व मित्रांना केला होता.

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रुग्णवाहिकेतून आनंदाला ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याबाबत सतीश दोंदे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक सुनील भामरे यांनी भेट दिली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून फिंगर प्रिंट घेतले आहेत. पोलिस उपनिरीक्षक सोपान राखोंडे तपास करीत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  कुंभ २०२७ साठी AI ची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा !

मृत आनंदा याने पगाराचे थकीत पैसे हॉटेल मालकाकडे मागितले असता, मालकाने रुपये देण्यास पुन्हा नकार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली.

ड्यूटी संपल्यानंतरही काम करावयास लावले व आत्महात्येस प्रवृत्त केल्याबाबत आनंदाने भ्रमणध्वनीवरून रडत ही घटना सांगितल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790