नाशिक: कपड्याच्या गोदामाला आग; जीवितहानी टळली

नाशिक (प्रतिनिधी): मनपा इंदिरा गांधी रुग्णालयामागे असलेल्या राजवाडयातील महाशक्ती सोसायटी येथे तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट मधील कपड्याच्या गोदामातील इस्त्री गरम करण्यासाठी विजेचे बटन चालू ठेवल्याने शुक्रवारी (ता.१८) रोजी आगीची घटना घडली.

पंचवटी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्याने जिवीतहानी टळली.

याबाबत माहिती अशी की, इंदिरा गांधी रुग्णालय मागे राजवाडा येथे महाशक्ती अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर प्रदीप भुसे यांचे कपड्याचे गोदाम आहे. शुक्रवार (ता.१८ ) रोजी सकाळी भुसे गोदामात आल्यावर त्यांनी गारमेन्टचे कपडे इस्त्रीसाठी बटन चालू केले आणि ते बटन बंद न करता देवदर्शन करायला गेले.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रावर शोककळा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन

काही वेळाने भुसे पुन्हा इमारतीत पोहचले असता धुर निघत असल्याने समजले. एका सुजाण नागरिकाने अग्निशमन दलाला सदर माहिती दिली.

पंचवटी अग्निशमन दल व के के. वाघ येथील केंद्र येथून प्रत्येकी एक एक असे दोन पाण्याचे बंब घेऊन अग्निशमन जवान दाखल झाले. जवानांनी तत्काळ तिसरा मजला गाठत गुदमात गारमेंट पेटलेले धुराचे लोळ पसरलेले असल्याने जवानांनी पाण्याचा मारा करत दोन तासांनी आग आटोक्यात आणली.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता

घटनेत गुदामातील गारमेंट माल जळून खाक झाल्याने भुसे यांचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यावेळी अग्निशामक दलाचे लिडींग फायरमन एम.के. सोनवणे, एस. जी. कानडे, पी.पी. बोरसे, फायरमन यू.आर. झिटे, वाहनचालक आर.आर. काटे, बी.एम. शिंदे, व्ही.एम. शिंदे यांचे सह ट्रेनी सब ऑफिसर यांनी आग आटोक्यात आणली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

नागरिकांनी केला सत्कार:
अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. आगीचे प्रमाण अधिक होते, धुराचे प्रमाण अधिक होते. आग विझवण्यासाठी फायरमन यांनी गच्ची हून फ्लॅटच्या पाठीमागील असलेली खिडकी तोडून आत प्रवेश करीत आग आटोक्यात आणली.

काही कर्मचाऱ्यांनी बिल्डिंग मधील अडकलेल्या इतर रहिवाश्यांना बाहेर काढले. आजू बाजूला असलेली दाट लोकवस्ती असल्याने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यानी आग आटोक्यात आणत कुठलीही जीवितहानी होऊ दिली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांनी आभार मानत सत्कार देखील केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790