नाशिक (प्रतिनिधी): खुनाच्या गुन्ह्यातील तीन वर्षानंतर तरुंगातून जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीला केलेल्या खुनाचा बदला घेत केलेल्या मारहाणीत मृत्यु झाल्याची घटना घडली असून दिंडोरी पोलिसांत याप्रकरणी २१ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सपना सागर लिलके वय 23 वर्ष, मुळ राहणार कोचरगाव, ता. दिंडोरी हल्ली रा. फोफळवाडे, ता. दिंडोरी यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनूसार जानेवारी २०२० मध्ये कोचरगाव येथील शिवाजी सुकदेव पारधी यांचा खुनाच्या गुन्ह्यात पती सागर भगवान लिलके, भाया उत्तम भगवान लिलके व दिपक भगवान लिलके तसेच सासरे भगवान एकनाथ लिलके सर्व रा. कोचरगांव यांना अटक झालेली होती.
दिपक लिलके यांना मार्च 2023, सासरे भगवान लिलके यांना एप्रील 2023, उत्तम लिलके यांना में 2023 व पती सागर लिलके यांना जुन 2023 मध्ये कोर्टाने जामीन दिल्याने ते घरी आले होते. दरम्यान हे सर्व कुटुंबीय फोफळवाडे, ता. दिंडोरी येथे सागर लिलके यांचे मामांचे शेतात तर कधी इतर लोकांचे शेतात शेतमजुरी करून उपजिवीका करत होते.
दरम्यान 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2.00 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास आंबेगण येथे सागर लिलके हा पत्नी व मुलीस खाजगी दवाखान्यात फोफळवाडे येथुन पायी गेले होते.
परंतु आदीवासी दिनानिमित्त दवाखाना बंद असल्याने ते परत फोफळवाडा येथे पायी येत असतांना सायंकाळी 4.30 ते 5.00 वा. च्या सुमारास फोफळपाडा फाट्यावरील त्रिफुलीच्या रस्त्यावर 7 ते 8 मोटारसायकल उभ्या होत्या व 20 ते 25 लोक हातात झेंडे घेवून नाचत असतांना, त्यांनी पाहिल्यानंतर सागा आला रे आला आता त्याचा काटा काढु असे ओरडले व समाधान प्रभाकर टोंगारे, दगु पारधी, संजय लिलके, चंद्रकांत पारधी, राजेंद्र पारधी, शिवाजी लिलके, साजन लिलके हे सागर लिलके यांच्या मागे हातात असलेल्या शस्त्रानिशी धावले.
यावेळी जिव वाचवण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात सागर पळाला असता, रस्त्याच्या कडेला असलेल्या ठाकरे यांच्या शेतात समाधान टोंगारे व सोबत असलेल्यांनी गाठून त्याच्या हातातील शस्त्रांनी मारहाण केल्याने सागर लिलके यांना गंभीर दुखापत होवून जागीच मृत्यु झाला.
याप्रकरणी कोचरगाव, ता. दिंडोरी येथील समाधान प्रभाकर टोंगारे, दगु पारधी, संजय लालु लिलके, योगेश लालु लिलके, चंद्रकांत कचरू पारधी, राजेंद्र रामदास पारधी, शिवाजी महादु लिलके, वाळु मुरलीधर लिलके, साजन मुरलीधर लिलके, मोहन मुरलीधर लिलके, सुनिल प्रकाश टोंगारे, लहानु काशिनाथ टोंगारे, संभाजी सुकदेव पारधी, सुकदेव नारायण पारधी, अजय रामदास पारधी, मुरलीधर चिमणा लिलके, सोमनाथ कचरू पारधी, निवृती लालु लिलले, प्रभाकर वामन टोंगारे, कचरू पारधी, सुरेश पांडुरंग लिलके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास ढोकरे यांच्यासह दिंडोरी पोलिस करीत आहेत.