नाशिक: भाचीला रुग्णालयात बघण्यासाठी जाणाऱ्या मामांचा अपघातात मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): पत्नीच्या भावाच्या आजारी मुलीला बघण्यासाठी रुग्णालयात जात असताना मामांच्या दुचाकीला सिमेंट मिक्सर या अवजड वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या मामांचा जागीच मृत्यू झाला.

वडाळारोडवर घडलेल्या या घटनेने परिसरातील संतप्त नागरिकांनी वाहनावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता.

विनयनगर येथील रहिवासी दादाजी (दगा) रामभाऊ शेवाळे (६२) हे बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास साल्याच्या मुलीला वडाळा येथील रुग्णालयात बघण्यासाठी दुचाकीवरून (एमएच १५ बीयू ७१२७) जात होते.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

रहेनुमा शाळे जवळील ‎पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकण्यासाठी ते वळत असताना त्यांच्या‎दुचाकीला सिमेंट मिक्सर अवजड वाहन (एमएच ४६ बीएम‎६०३६) ने धडक दिली. यात शेवाळे हे जागीच ठार झाले.

त्यांचे‎ पश्चात दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. अपघाताची ‎माहिती परिसरात पसरल्यानंतर घटनास्थळावर युवकांनी मोठी गर्दी‎केली होती. तसेच, संतप्त जमावाकडून अवजड वाहनाची‎तोडफोडदेखील करण्यात आली. मुंबईनाका पोलिस तातडीने‎ घटनास्थळावर पोहोचल्याने तणाव निवळला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

या घटनेनंतर‎ वडाळारोडवरील अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला‎आहे. वडाळा-इंदिरानगर रस्त्यावर रहेनुमानगर, अशोक रोड,‎ विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगरसह विविध उपनगरे आहेत. या‎रस्त्यावर दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते.‎ तसेच या रस्त्यावर प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालय असल्याने‎दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते. असे‎असताना या भागातून मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टँकर अशी अवजड‎वाहने वाहतूक सुरू असते. त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण‎करणारे पादचारी व छोटे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे‎

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

वडाळा रस्त्यावर वर्षभरात १२ अपघात:
द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा, इंदिरानगर, पाथर्डी रस्त्याने वळविण्यात आल्याने या मार्गाचा वापर करणाऱ्या स्थानिक नागरिकांसह परिसरातील व्यापारी व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. मागील वर्षभरात या रस्त्यावर १३ अधिक अपघात झाले आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here