नाशिक: लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्याकडे सापडले ‘इतके’ घबाड

नाशिक (प्रतिनिधी): येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल शनिवार (दि.०५) रोजी सायंकाळी १५ लाख रुपयांची लाच घेतांना नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Naresh Kumar Bahiram) यांना रंगेहाथ पकडले होते.

त्यानंतर आज (दि.०६) रोजी त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ०८ ऑगस्ट म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्या घरात लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहिल्या दिवशी एसीबीने केलेल्या चौकशीत लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्या घरात सुमारे २५ लाख रुपये किंमत असलेले ४० तोळे सोने सापडले आहे. तसेच ४ लाख ८० हजार रुपयांची रोकड देखील बहिरम यांच्या घरात सापडली आहे. त्यानंतर आता बहिरम यांचे बँक खाते, बँक लॉकर, अन्य स्थावर मालमत्ता या सर्वांचीच झडती एसीबीकडून घेतली जाणार आहे. न्यायालयाने कोठडी सुनावताच एसीबीच्या पथकाकडून आणखी आक्रमकपणे तपास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

लाचखोर तहसीलदार बहिरम यांच्या कार्यालयाकडून नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनी मालकांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १ कोटी २५ लाख ०६ हजार २२० रुपयांच्या दंड आकारणीबाबत आदेश देण्यात आले होते.

त्या आदेशाविरुद्ध जमिनी मालक यांनी उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे अपील दाखल केली होती. त्याबाबत आदेश होऊन या प्रकरणाची पुन्हा फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम (तहसीलदार नाशिक) यांच्याकडे पाठवण्यात आले होते. या मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनी मालक यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासनमान्य ग्रंथ यादी निवडीकरिता प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

त्यानंतर याबाबत पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरम यांनी जमिनी मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षणवेळी बोलावले होते. पंरतु, जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाईसाठी अधिकार पत्र दिल्याने ते लाचखोर बहिरम यांना स्थळ निरीक्षणवेळी भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ लाख रुपयांच्या लाचेची  मागणी केली.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रावर शोककळा: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन

लाचखोर बहिरम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून सखोल चौकशी (Inquiry) सुरु असून त्यांच्याकडे आणखी काही घबाड सापडण्याची शक्यता आहे.        

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790