नाशिकची सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प… विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे प्रचंड हाल

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकची सिटीलिंक ही शहर बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. वेतन मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. त्यामुळे पहाटेपासून सर्व बसेस बंद आहेत.

परिणामी, सकाळपासून विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून युवकावर कोयत्याने हल्ला

वेतन मिळत नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र हाती घेतले आहे. गेल्या महिन्यातही या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे सलग २ दिवस बससेवा ठप्प होती.

आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. कंत्राटदाराकडून वेतन मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: ११ वर्षीय मावस भावाने गळा आवळल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

गेल्या आंदोलनावेळी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने सांगितले होते की, थकीत वेतन तातडीने अदा केले जाईल. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याची तक्रार आहे.

दररोज लाखो प्रवासी शहर बससेवेचा लाभ घेतात. खासकरुन सकाळच्या सुमारास शहराच्या विविध भागातून शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, सरकारी वा खासगी कार्यालयात जाणारे कर्मचारी, अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे जाणारे प्रवासी त्याचा लाभ घेतात. या संपामुळे सर्वांचेच खुप हाल होत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790