Breaking: नाशिकला बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्त्या

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर येथील कामगारनगरमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सतरा वर्षीय मुलाने मंगळवारी (ता.१) दुपारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली.

सातपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कृष्ण विनोद सिंग (१७, रा. कामगार नगर, सातपूर) असे मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा याने मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घरात कोणीही नसताना गळफास घेतला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयता घेऊन दहशत माजवणारा तरुण गुन्हे शाखेच्या ताब्यात !

त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. आई व भावासमवेत राहणारा कृष्ण हा बारावीच्या वर्गात शिक्षत होता.

लॅपटॉपवर शेअर मार्केटिंगही करायचा. त्याची आई कामानिमित्ताने दुपारी कंपनीत गेलेली होती. त्याचवेळी त्याने गळफास घेतला. आत्महत्त्येमागील कारण समजू शकलेले नाही.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790