कौतुकास्पद! नाशिकची काठेगल्ली शाळा ‘स्मार्ट स्कूल’मध्ये देशात दुसरी, गोव्यात पुरस्कार वितरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिककरांसाठी आनंदाची बातमी असून नाशिक महापालिकेच्या शाळेने नाशिकचे नाव देशात उंचावले आहे. स्मार्ट स्कूल प्रकल्पाअंतर्गत कायापालट झालेल्या नाशिक महापालिकेची काठे गल्ली शाळा क्रमांक 43 चा देशभरात डंका वाजला आहे.

केंद्राच्या इकॉनॉमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेकने स्मार्ट स्कूल स्पर्धेतील सर्वेक्षणात काठेगल्ली शाळेला डिजिटल या कॅटेगरीत देशभरात दुसरा क्रमांक मिळाला आहे. येत्या शनिवारी गोव्यात पुरस्कार सोहळा होणार असून नाशिक मनपा शिक्षण विभागाला रौप्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील मनपाच्या शाळा स्मार्ट स्कुल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. यात पालिकेच्या 74 पैकी 457 बिंदूंवर आधारित सर्वेक्षण करण्यात आलेल्या 69 शाळा इमारती येत्या वर्षभरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन फरार आरोपींना अटक !

त्यासाठी मनपा स्तरावर हालचाली सुरु आहेत. नाशिक महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल ही संकल्पना राबविण्यात येत असून ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी मार्फत 69 शाळांचे 656 वर्ग डिजिटलाईज होणार आहेत. येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना स्मार्ट बनविण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान शहरातील काठे गल्ली येथील मनपा शाळा क्र. 43 मध्ये आठ स्मार्ट पायलट क्लासरुम सुरु करण्यात आले. एक कोटी रुपयांचा निधी खर्च करुन शाळेला डिजीटल बनवत रुपडे पालटवण्यात आले. याची दखल केंद्र सरकारने घेत इकॉनॉमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेक या संस्थेने देशभरात स्मार्ट स्कूल या उपक्रमात सहभागी झालेल्या शहरांना भेटी दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

या संस्थेच्या पथकाने काठे गल्ली शाळेला भेट देत डिजीटल स्कूलची पाहणी केली. या स्पर्धेत काठे गल्ली शाळेला दुसरा क्रमांक देण्यात आला. येत्या पाच ऑगस्टला गोव्यात ‘गव्हर्नमेंट डिजिटल अवॉर्ड 2023’ पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यास महापालिका शिक्षणाधिकारी बी.जी.पाटिल उपस्थित राहणार असून सन्मान स्विकारणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

अशी आहे डिजिटल स्कूल:
दरम्यान शहरातील काठे गल्ली शाळेतील क्लासरुममध्ये पारंपरीक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड, नवीन बेंचेस, इंटरनेट कनेक्शन, डीजिटल अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा आहे. पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. तसेच शाळेत 21 संगणकांचा एक कक्ष विकसीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट स्कूल उपक्रमाअंतर्गत डिजिटल स्कूल कॅटेगरीत मनपाच्या काठे गल्ली शाळेला दुसरा क्रमांक मिळाला असून रौप्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे. येणार्‍या काळात मनपाच्या शाळांत गुणवत्ता वाढ, विद्यार्थी संख्या वाढवणे व ती टिकवणे या त्रिसुत्रीवर काम केले जाईल, अशी माहिती मनपा शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटिल यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790