नाशिकला डोळ्यांच्या रुग्णांत सातत्याने वाढ; शहरात 300 डोळ्यांचे रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): शहरात डोळ्यांची साथ कायम असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल ३०० रुग्णांची नोंद झाली आहे.

डोळ्यांच्या रुग्णांत सातत्याने वाढ होत असल्याने महापालिका यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

गेल्या पाच दिवसापासून डोळ्यांच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालय, बिटको रुग्णालय, डॉक्टर झाकिर हुसेन रुग्णालय, तसेच इंदिरा गांधी रुग्णालयाच्या अहवालानुसार मंगळवारी तीनशे रुग्णाची नोंद झाली आहे. २७ जुलैला शहरात १४४, तर २८ जुलैला १५६ रुग्णांची नोंद झाली होती.

हे ही वाचा:  नाशिक: विघ्नेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कोजागिरी निमित्त आज (दि. १६) 'स्वर चांदणं' संगीत मैफल

२९ जुलैला १७९, तर ३० जुलैला २५६ डोळ्याचे रुग्ण होते. १ ऑगस्टला तब्बल ३०० रुग्णांची नोंद झाली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790