नाशिक: झाडावर दुचाकी आदळून दोघे ठार

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव जाणारी दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. वरवंडी रोड, डगवस्ती येथे हा अपघात घडला.

महसुल पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पोलीस कर्मचारी पारधे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोहित रतन कडाळे (वय २२) आणि रोशन वसंत चौधरी (वय १७) (दोघे राहणार पेठरोड) हे दोघे दुचाकीने महसुल, वरवंडीरोडने भरधाव दुचाकीने जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर जाऊन आदळली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

या अपघातात दोघांच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार लागल्याने दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना दोघांचा मृत्यू झाला. दोघेही वीटभट्टी कामगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक निरीक्षक व्ही. डी. अहिरे करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790