नाशिक: पत्नीचे प्रियकरासमवेत पलायन; पतीची आ त्म ह त्या

नाशिक (प्रतिनिधी): सिडकोत राहणाऱ्या विवाहितेने तीन मुले व पतीला सोडून प्रियकरासमवेत पलायन केले. पत्नीच्या या कृत्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या पतीने गळफास घेत आ त्म ह त्या केली आहे. याप्रकरणी संशयित पत्नीविरुद्ध पतीस आ त्म ह त्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश रमेश लोहार (३८, रा. सिडको, नाशिक. मूळ रा. पाडळसा, ता. यावल, जि. जळगाव) असे मयत पतीचे नाव आहे. जागृती सतीश लोहार (३३), असे संशयित पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागृतीचा विवाह २००६ मध्ये सतीश यांच्याशी झाला होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

त्यानंतर त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. सतीश हे खासगी कंपनीत नोकरी करून उदरनिर्वाह करीत होते. काही वर्षांपासून जागृती हिचे ओळखीतील तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. यावरून पती- पत्नीत वाद होत होते.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

सतीशने बऱ्याच वेळी जागृतीला समजावून सांगितले. तरी तिने प्रियकराचा नाद सोडला नाही. अखेरीस पत्नी जागृती हिने मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून प्रियकरासमवेत पळून गेल्याचे त्यांना सहन झाले नाही.

यातून त्यांनी गेल्या २ जुलैला सिडकोतील घरात गळफास घेत जीवन संपविले, अशी फिर्याद सतीश यांचे वडील रमेश कडू लोहार (रा. पाडळसा, ता. यावल) यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील बिडकर करत आहेत. सध्या या प्रकरणात जागृती व तिच्या प्रियकराचा शोध अंबड पोलिस घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790