नाशिक: गाड्यांची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ दोघा संशयितांची पोलिसांनी काढली धिंड

नाशिक (प्रतिनिधी): त्रिमूर्ती चौक ते हेडगेवार नगर दरम्यान कोयत्याने १६ गाड्यांच्या काचा फोडत दहशत माजविणाऱ्या दोघा संशयितांची पोलिसांनी परिसरातील नागरिकांच्या मनातून भीती जावी याकरिता धिंड काढली.

हेडगेवार नगर भागात मध्यरात्री मंगळवारी दोन टवाळखोर गुंडांनी दहशत माजवीत मद्याच्या नशेत शिवीगाळ करीत, वाहनांवर राग काढत तोडफोड केली होती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

याबाबत अंबड पोलिस दोन संशयितास अटक करीत त्यांची दुसऱ्या दिवशी परिसरातून धिंड काढली.

हेडगेवारनगर भागात काही कार, चारचाकी वाहने, रिक्षा यांच्या काचा फोडत शिवीगाळ करत आरडाओरडा करीत संशयित जयेश हर्षवर्धन भालेराव (१९) व सूरज दिलीप चव्हाण (१९, दोघेही रा. दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक) यांनी दहशत माजवली होती.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करा- पालक सचिव एकनाथ डवले

पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी अंबड पोलिसांनी परिसरातून त्यांची धिंड काढून गुन्हेगारीवर वचक बसविण्याचा प्रयत्न केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790