नाशिक: म्हसरूळला  टोळक्याच्या प्राणघातक हल्ल्यात दोन युवक जखमी

नाशिक (प्रतिनिधी): शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

अशातच आता पुन्हा एकदा शहरातील म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत मागील भांडणाची कुरापत काढून चार जणांनी तिघांवर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे…

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

याबाबत अधिक माहिती अशी की, सौरभ विठ्ठल कदम (वय २०, रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, आदर्शनगर, पेठ रोड, नाशिक) यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्या तक्रारीत म्हटले आहे की, सोनू धात्रक, सागर येलमामे, रोहित पगारे, पप्पू रणमाळे (पत्ता माहित नाही) यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील चाणक्य हाऊसिंग सोसायटी समोरील कृष्णा सोसायटी मखमलाबाद म्हसरूळ लिंक रोडवर संगनमत करून जुन्या भांडणाची कुरापत काढत सौरभ कदमसह दोघांना हत्याराने तसेच लाकडी दांडक्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

त्यानंतर म्हसरूळ पोलिसांनी सौरभ कदम याच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरोधात भादवि कलम ३०७ आणि भारतीय हत्यार कायदा कलम व कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०१३५/२०२३, भारतीय दंड विधान: ३०७, भारतीय हत्यार कायदा ४/२५, एम पो का कलम १३५) या हल्ल्यात फिर्यादी सौरभसह सुरज चारोस्कर, दत्तू शेलार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790