लग्नाचे आमिष दाखवून नाशिकच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयिताला बिहारमधून अटक

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन पीडितेवर वारंवार अत्याचार केल्यानंतर पसार झालेल्या संशयिताला भद्रकाली पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.

असगर अली इसराफील अन्सारी (१९, रा. जाडोपूर, दुखहरण, ता.जि. गोपाल गंज, बिहार) असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडितेशी संशयिताने ओळख करून प्रेम असल्याचे सांगत लग्न करण्याचे आमिष दाखविले.

तसेच वेळोवेळी घड्याळ, पायातील पट्ट्या, अंगठी अशा भेटवस्तू दिल्या. यादरम्यान त्याने पीडितेला संदर्भ हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बांधकाम सुरू असलेल्या खोलीत नेऊन गेल्या एप्रिल महिन्यापासून १५ मेपर्यंत वारंवार शारीरिक संबंध केले.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

तसेच, १५ मे रोजी, मी तुला घेण्यासाठी नाशिकरोडला येतो, आपण लग्न करून तू तुझे सामान घेऊन ये, असे खोटे सांगून संशयित अन्सारी त्याच्या बिहारमधील मूळगावी निघून गेला. पीडितेने त्याच्याशी संपर्क साधला असता, संशयिताने, मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगत फोन कट करीत होता. याप्रकरणी फसवणूक झाल्याने पीडितेने भद्रकाली पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

थेट बिहारमधून अटक:
दरम्यान, भद्रकाली पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित बिहारमधील त्याच्या मूळ गावी असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी पथकासह गोपालगंज जिल्ह्यातील जाडोपूर गाठले आणि संशयित अन्सारीच्या मुसक्या आवळल्या.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

त्यास न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कामगिरी भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे, किरण जाधव, विशाल गायकवाड यांनी बजावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790