नाशिक: तरुणीवर अत्याचार प्रकरण; संशयित 2 दिवस पोलिस कोठडीत, आरोपीच्या आईवरही गुन्हा

नाशिक (प्रतिनिधी): एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर ती गर्भवती राहिली. पण तिचा गर्भपात करुन तिला लग्नास नकार देऊन शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संशयितास अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर असता दिनांक १४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील प्रकरणाचा पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लियाकत पठाण करत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी मुजीब उर्फ मुज्जफर जराक खान (वय वर्षे २८ रा. फ्लॅट नंबर २ कींग्ज अपार्टमेंट आडके नगर, देवळाली कॅम्प) याचे सुमारे नऊ वर्षापासून एका मुलीशी मैत्री होती. संशयित आरोपीने मुलीस लग्नाचे आमिष दाखवून सन २०१७ ते जानेवारी २०२३ दरम्यान फिर्यादी मुलीसोबत त्याच्या राहत्या घरी मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

शारीरिक संबंधामुळे जानेवारी २०२३ मध्ये फिर्यादी मुलगी गर्भवती राहिली त्यावेळी संशयित आरोपी मुजीब खान व त्याच्या आईने नाशिकरोड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आपली सून असल्याचे सांगून गर्भपात केला. त्याच प्रमाणे संशयित आरोपी मुजीब खान याने ”तू कुणाशी लग्न करू शकत नाहीस आणि मी ही तुझ्याशी लग्न करणार नाही. आपल्यातील प्रकरण कुणाला सांगू नको, नाहीतर मी तुझ्या घरच्यांना मारून टाकेल” अशी धमकी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

तसेच फिर्यादी मुलीस शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली म्हणुन अत्याचार पीडित मुलीने देवळाली कॅम्प पोलिस ठाणे गाठून संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन रविवार दिनांक ११ रोजी न्यायालयात हजर केले. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवार दिनांक १२ जून रोजी त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी दिनांक १४ पर्यंत वाढवून देण्यात आली आहे .

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790