नाशिक: लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरकडे सापडलं मोठं घबाड; तपासात धक्कादायक माहिती उघड

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५५ हजारांची लाच स्वीकारतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागाचे लिपिक नितीन जोशी यांना रंगेहाथ पकडले होते.

या कारवाईमुळे नाशिक महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली होती…

त्यानंतर काल एसीबीने शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी करत अटक केली होती. यानंतर त्यांच्या घराची एसीबीने झाडाझडती घेतली असता त्यात ८५ लाख रुपये रोख व ३२ तोळे सोने, २ फ्लॅट आणि एक प्लॉट असे घबाड हाती लागल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

यावेळी वालावलकर म्हणाल्या की, तक्रारदार एका शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक होते. काही कारणांनी त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांनी शिक्षण लवादाकडे दाद मागितली असता बडतर्फीला स्थगिती देण्यात आली. तरीही शैक्षणिक संस्था त्यांना कामावर पुन्हा रुजू करत नसल्याने त्यांना कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी ५० हजारांची लाच मागितले.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

त्यानंतर त्यांचे लिपिक नितीन जोशी यांनी ते पत्र बनवून देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर नियमानुसार धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली. घर झडतीत ८५ लाख रुपयांची रोकड, ३२ तोळे सोने, तीन प्रॉपर्टीचे कागदपत्र, काही बँक अकाउंट्स सापडले आहेत. त्यांच्या राहत्या पुढील तपास पोलीस करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. फ्लॅटची किंमत तब्बल दिड कोटी असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या छाप्यामुळे नाशिक मनपात सुरु असलेल्या मोठमोठ्या व्यवहारांबद्दलच्या सुरस कथा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे यापेक्षाही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790