नाशिक हादरलं! डोक्यात बियरची बाटली फोडून एकाला संपवलं, संशयितांनी मोबाईल, वाहन पळवलं!

नाशिक हादरलं! डोक्यात बियरची बाटली फोडून एकाला संपवलं, संशयितांनी मोबाईल, वाहन पळवलं!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना उघडकीस आली आहे. मुंबई येथील प्रवीण मधुकर दिवेकर या व्यक्तीचा गळा चिरून, डोक्यात बियरची बाटली फोडून खून करण्यात आला आहे.

संशयित घटनस्थळावरून मयताचा मोबाईल, वाहन घेऊन फरार झाल्याने खून कुणी व का केला याविषयी पोलीस तपास सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:  महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्याची चिन्हे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून अधोरेखित होत आहे. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाला की काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

रोजच घडणाऱ्या घटनांनी शहर हादरत आहेत. अशातच मुंबई येथील प्रवीण मधुकर दिवेकर हे मागील पंधरा दिवसांपासून ते जेलरोड येथे एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांना आजूबाजूला कोणीही ओळखत नव्हते. मात्र प्रविणची मुलगी फोन करून विचारपूस करत असे.

हे ही वाचा:  नाशिक: कुंभमेळ्यातील गर्दी नियोजनासाठी सूक्ष्म नियोजन करावे- अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल

दरम्यान सोमवारी सकाळी मुंबईहून दिवेकर यांचे आई-वडील नाशिकला खरेदीसाठी आल्यावर मुलाला भेटण्यासाठी घरी आले. तेव्हा प्रवीण दिवेकर जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले.

त्यावेळी मृत दिवेकर यांच्या गळ्यावर विळीने वार करण्यात आले असून मद्याच्या बाटल्या फोडून काचांनी त्यांच्या शरीरावर वार करण्यात आलेले होते. सदरची घटना सोमवारी पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. तर, रविवारी रात्री प्रवीण दिवेकर यांनी कुटुंबियांना फोन करून बोलल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वेळीच करून घ्या तपासणी- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे

FollowUp/Update: नाशिक: जेलरोडच्या खुनाचा उलगडा; ‘या’ कारणातून झाला होता खून

फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत नमुने संकलित केले आहेत तर, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींचा शोध घेत फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सद्यस्थितीत संशयितांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कौटुंबिक वादातून ही घटना घडली का, यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790