नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; ॲट्रोसिटीसह बलात्काराचा गुन्हा
नाशिक (प्रतिनिधी): पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. पीडिता गरोदर राहिल्यानंतर संशयिताने लग्नास नकार दिला. तर संशयितासह दोघा महिलांनी पीडितेला जातिवाचक शिवीगाळ केली.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात बलात्कारासह ॲट्रोसिटीअन्वये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल प्रकाश वारा, प्रकाश वारा, जयश्री प्रकाश वारा (तिघे रा. अरिंगळे संकुल, सामनगाव रोड, नाशिकरोड), गीता (रा. सातपूर) अशी संशयितांच नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित अमोल याच्याशी पीडितेचे प्रेमसंबंध होते.
त्यातून संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून पीडिता गरोदर राहिली असता, संशयिताने बाळ वाढविण्यास व लग्नास नकार दिला. तर, संशयिताचे आईवडील व बहिणीने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली.
सदरचा प्रकार डिसेंबर २०२१ ते १४ मे २०२३ या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे हे तपास करीत आहेत.