UPSC मध्ये मराठी उमेदवारांचा डंका; नाशिकमधील तिघांना मिळाले यश

UPSC मध्ये मराठी उमेदवारांचा डंका; नाशिकमधील तिघांना मिळाले यश

नाशिक (प्रतिनिधी): युपीएससी परीक्षा 2022 चा निकाल आज जाहीर झाला असून यंदा नाशिकच्या तिघांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपला झेंडा रोवला आहे. त्यात दिव्या अर्जुन गुंडे, स्वप्नील पवार व गौरव कांयंदे पाटील यांंचा समावेश आहे.

यंदा पहिल्या चार रँकवर मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये इशिता किशोर हिने देशात पहिली रँक मिळवली आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर गरिमा लोहिया आणि तिसर्‍या क्रमांकावर उमा हरती एन, चौथा क्रमांक मयूर हजारिका आणि पाचवा रत्न नव्या जेम्सने मिळविला आहे.

हे ही वाचा:  महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

विशेष म्हणजे यंदाचा युपीएससीचा निकाल हा महाराष्ट्रासाठी खास ठरला असून ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली आली. तर युपीएससीमध्ये तब्बल 15 मराठी उमेदवार हे युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले असून हे सर्व उमेदवार आता आयएएस,आयपीएस किंवा इतर सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होणार आहेत.

यात नाशिकच्या दिव्या अर्जुन गुंडे देशात 265वी, गौरव कायंदे-पाटील देशात 146 वा , व स्वप्नील पवार 418 क्रमांक मिळविला. त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: रथसप्तमीनिमित्त रामकुंडावरील सूर्यमंदिर आज भाविकांसाठी खुले

दिव्या ही आदीवासी विकास आयुक्त नयना गुंडे व नाशिक जिल्हा परीषदेचे अतीरीक्त मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. अर्जुन गुंडे यांची कन्या आहे. सध्या ती केंद्रशासित प्रदेशात सहाय्क जिल्हाधीकारी पदाचे प्रशिक्षण घेत आहे. त्यात तीने हे यश मिळवीले आहे.

गौरवने सिंहगड कॉलेज पुणे येथून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. नंतर टीबको कंपनीच्या मुंबई व पुणे मध्ये अडीच वर्ष असोसिएट कन्सल्टंट म्हणून काम केले. पुणे येथील युनिक अकॅडमी येथून 2019 साली अभ्यासाची सुरुवात केली.त्यानंतर पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा ऑप्शनल विषय युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी निवडला. विशेष म्हणजे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून त्याने एम. ए. पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण देखील घेतले असून त्या विषयात सेट आणि नेट या परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून २४ लाखांना गंडा

स्वप्नील हा मुळचा भगुरचा असुन सध्या टाकळीरोडवर राहत आहे. त्याचे वडील जगन्नाथ पवार रिक्षाचालक आहेत. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790