नाशिक: प्रतिबंधित गुटख्याचा मुख्य सप्लायर जेरबंद; 2 दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक: प्रतिबंधित गुटख्याचा मुख्य सप्लायर जेरबंद; 2 दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक (प्रतिनिधी): विहीतगाव परिसरातील ८० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा साठ्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला जेरबंद केले.

अनिल ऊर्फ बाळू प्रभाकर अमृतकर (५२, रा. रामसेतू सोसायटी, नाशिक-पुणे रोड) असे नाव असून, शहरात प्रतिबंधित गुटखा तोच सप्लायर करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उधमाळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’ विकसित होणार; खगोल पर्यटनाला चालना

याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (ता. १०) सापळा रचून विहीतगाव येथे संशयित सोमनाथ चौधरी (४६, रा. माऊली निवास, वृंदावन कॉलनी, विहीतगाव) रिक्षातून प्रतिबंधित गुटख्याच्या गोण्या उतरविल्या जात असताना अटक केली होती.

याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करताना शहरात आणण्यात येणारा प्रतिबंधित गुटख्याचा संशयित बाळू अमृतकर हा मुख्य सप्लायर असल्याचे समोर आले होते.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील 'या' 11 जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’, हवामान विभागाचा अंदाज, वाचा सविस्तर...

त्याचा शोध घेत असताना पोलिसांनी भद्रकालीतून झाईद अन्सार शेख (२३) यास अटक केली. अखेर बाळू अमृतकर यालाही त्याच्या राहत्या घरातून उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा संशयित अमृतकार हा शेजारील राज्यातून चोरीछुप्या आणतो आणि शहरातील व्यापाऱ्यांना रात्री व पहाटेच्या वेळी पोच करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'डिजिटल अरेस्ट'चा धाक दाखवत वृद्धेला १५ लाखांचा गंडा; मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली फसवणूक

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे व त्यांचे पथक गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790