Breaking: क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने नाशिकमध्ये तब्बल चार कोटींची फसवणूक

क्रिप्टो करन्सी मिळवण्याच्या नादात नाशिक शहरातील पंधरा जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक (प्रतिनिधी): ऑनलाईन फसवणुकीबाबत सायबर पोलिसांकडून सातत्याने जनजागृती होत असताना देखील फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच गेल्या काही वर्षात क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढत आहेत. क्रिप्टो करन्सी मिळवण्याच्या नादात नाशिक शहरातील पंधरा जणांची चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचेसमोर आले आहे.

नाशिक: वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

फेक वेबसाईट आणि अँपच्या माध्यमातून देशभरात फसवणुकीचे पेव फुटले आहेत. यात सामान्य नागरिकांसह सुशिक्षित तरुण देखील जाळ्यात ओढले जात आहेत. अनेकजण दुप्पट परतावा मिळावा म्हणून कोणत्याही वेबसाईट, अँपची शहनिशा न करता व्यवहार करत असल्याचे या घटनांमधून अधोरेखित होत आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

नाशिक: सावधान ! पॉलिश लावून देण्याच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास

नाशिकमधील काही नागरिक याला बळी पडले असून जवळपास चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. या प्रकरणातील संशयितांनी वेबसाईट आणि अँपच्या माध्यमातून नाशिक शहरातील गुंतवणूकदारांना गंडा घातला आहे.

नाशिकमधील कामगार नेत्याच्या मुलाचा विदेशात इमारती वरून पडून दुर्दैवी मृत्यू

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

याप्रकरणी युवराज  गायकवाड-पाटील यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मोहम्मद हबीब मोहम्मद नीफ आणि मोहम्मद अब्बास, हम्मद युसूफ या संशयितांनी 2021 मध्ये त्यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. याबाबत दाखल गुन्ह्यानुसार आत्तापर्यंत 15 गुंतवणूकदारांची चार कोटी 18 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत आहे. संशयितांनी संगनमत करून युवराज यांच्यासह त्यांचे मित्र व इतरांना बक्षिसे, लक्झरी कार, विदेश यात्रा आणि सहा महिन्यांत गुंतवणुकीच्या दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी सुरुवातीस संशयितांनी गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर सहा महिन्यांनी

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

संशयितांनी एक वेबसाईट आणि अँप तयार करण्यास भाग पाडले. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी लाख रुपये ॲपवर संकेतस्थळावर गुंतवले मात्र त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नाही त्याचबरोबर गुंतवलेली रक्कम देखील परत मिळाले नाही. वारंवार चौकशी करूनही संबंधितांना प्रतिसाद मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790