नाशिक (प्रतिनिधी): सिडको परिसरातील कामाठवाडे येथे शुक्रवारी रात्री दोघ भावांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकिंनंतर भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खुन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार न्यू गोपाल चौक, कामठवाडे येथे राहणारे मयत सदाशिव दामू निकम (वय ५५ ) व संशयित हरि दामू निकम (वय ५०)यांच्यात रात्री नऊ वाजेच्या सुमारास ‘तू मला शिवीगाळ का करतो’ या शुल्लक कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले.
नाशिक: उपनगरचा सहायक पोलिस निरीक्षक डगळे यास लाच घेताना अटक; सिव्हिलमध्ये कारवाई
यामध्ये संशयित हरी दामू निकम याने सख्या मोठ्या भावाच्या म्हणजेच सदाशिव दामू निकम डोक्यात लाकडी दांडुका मारून त्यांना मारहाण केली. यावेळी अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सूरू असतांना सदाशिव निकम यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
बायडी कैलास सुर्यवंशी यांनी अंबड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हरि दामू निकम याच्यावर भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाईद शेख करीत आहेत. मयत सदाशिव निकम याच्या पश्यात तीन मुले व दोन मुली परिवार आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790