04 मार्च 2026
आजचे पंचांग: आज ४ मार्च हा बुधवार आहे. तसेच आज चैत्र फाल्गुन पक्षाची प्रतिपदा तिथी आहे, जी आज दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत राहील. आजपासून वसंत ऋतूचा प्रारंभ होतोय. धृती योग आज सकाळी ८ वाजून ५३ मिनिटांपर्यंत राहील. तसेच पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज सकाळी ७ वाजून ३९ पर्यंत राहील. त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुरू होईल. तर राहुकाल दुपारी १२ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजून ३० पर्यंत राहील. आजच्या या पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात कोणत्या राशींवर धनलक्ष्मीची कृपा राहील जाणून घेऊ….
मेष राशी:
नटण्याची हौस पूर्ण कराल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल. प्रेमाच्या दृष्टीने नवीन मैत्री लाभेल. सर्वांशी मधुर वाणीने बोलाल.

वृषभ राशी:
प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कामात चंचलता आड येऊ शकते. भावंडांची बाजू जाणून घ्यावी. प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.
मिथुन राशी:
रेस मध्ये चांगला लाभ होईल. मुलांच्या वेगळ्या खर्चाचे नियोजन करावे. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. काहीसे छांदीष्टपणे वागाल. करमणुकीसाठी अधिक वेळ घालवाल.
कर्क राशी:
उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील ज्येष्ठांची मदत होईल. मनाचा सज्जनपणा दाखवाल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल. सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.
सिंह राशी:
दूरच्या प्रवासाचा योग येईल. मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते. जवळचे मित्र भेटतील. भावंडांच्या समस्या समजून घ्याल.
कन्या राशी:
जुन्या कामातून लाभ होईल. पैशाचा सदुपयोग कराल. खाण्या पिण्याबाबत चोखंदळ राहाल. मौल्यवान वस्तूंची आवड दर्शवाल. व्यावसायिक लाभ उत्तम होईल.
तूळ राशी
आपले कर्तव्य योग्य रीतीने बजावाल. आपले मत इतरांना मान्य करायला लावाल. प्रशासकीय भूमिका घ्याल. कामाचा उरक वाढेल. चिकाटीने कामे कराल.
वृश्चिक राशी:
आध्यात्मिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कराल. ऐहिक गोष्टींची कामना करू नये. मनात नसतानाही प्रवास करावा लागेल. ढोंगी लोकांविषयी तिटकारा दाखवाल. ठाम निर्णयावर भर द्यावा.
धनू राशी:
अचानक धनलाभ संभवतो. मित्रांशी मतभेद संभवतात. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. भडकपणे मत मांडू नका.
मकर राशी
जोडीदाराची कर्तबगारी दिसून येईल. शांत संयमी विचार कराल. कामात पत्नीचा हातभार लाभेल. जबाबदारीने कामे उरकाल. चार-चौघांत कौतुक केले जाईल.
कुंभ राशी
अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. कामातील दिरंगाई टाळावी. श्रद्धेची बाजू लक्षात घ्यावी. वडीलांच्या मताचा आदर करावा. इतरांना आनंदाने मदत कराल.
मीन राशी:
मुलांचा उडणारा गोंधळ दूर करावा. सतत काळजी करत बसू नये. रेस जुगारातून लाभ संभवतो. भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी नाशिक कॉलिंग केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून नाशिक कॉलिंग कोणताही दावा करत नाही.)
![]()
