नाशिक: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या

नाशिक (प्रतिनिधी): अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने हत्या केल्याची घटना बागलाण तालुक्यात घडली आहे. या खूनाचा तपास जायखेडा पोलिसांनी अवघ्या 8 तासात लावला असून, संशयित पत्नीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, काल सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास एक अज्ञात इसमाचा मृतदेह मोसम नदी काठावरील स्मशानभूमी- लगत आढळून आला. त्याच्या डोक्यावर व चेहर्‍यावर गंभीर जखमा दिसल्याने हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला.

या मृत व्यक्‍तीचा शोध सुरु केला असता तो लाडूद येथील रहिवासी असून, दत्तात्रय उर्फ पिंट्या राजाराम ठाकरे (वय 40) असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांना समजले.

तपास सुरू असताना पोलिसांनी प्रथम त्याच्या पत्नीला तपासासाठी बोलावले. ती तपासादरम्यान उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना लक्षात आले. त्यांनी तिला पोलिसी खाक्या दाखवताच हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले.

मयताची पत्नी माधुरी ठाकरे (वय 25) हिचे नंदुरबार जिल्ह्यातील आसने येथील भरत इलाचंद पाटील (वय 31) याच्याशी प्रेम संबंध होते. आरोपी मयताच्या पत्नी बरोबर स्वतंत्र संसार थाटण्याच्या विचारात होता. मात्र मयत ठाकरे हा त्यांच्यात अडसर ठरत असल्याने आरोपीने ठाकरे यास दारू पाजून मोसम नदीकाठी नेले व त्याचा साथीदार राकेश पावबा सावळे (वय 18, रा. आसने ता.जि. नंदुरबार) याच्या मदतीने डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली.

मोसम नदी काठावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. गाव परिसरात घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. जायखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल घटनेचा आढावा घेतला. मात्र मृत व्यक्ती कोण? कुठला? याची ओळख पटविण्यासाठी जायखेडा पोलिसपुढे मोठे आव्हान ठाकले होते. पोलिसांनी तपासचक्र जोमात फिरवली असता पोलीस हवालदार राजेश सावळे यांनी जायखेडा पोलीसांना मयताच्या खिशातील औषधाच्या कागदावरून मयताच्या नावाचा उलगडा करण्यात यश आले. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह दोघ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जायखेडा पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून अवघ्या 8 तासांत या खूनाचा उलगडा केला. याप्रकरणी मयताच्या पत्नीसह दोघांवर खूनाचा गुन्हा जायखेडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790