नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी) सोमेश्वर धबधबा येथे मित्रासमवेत फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
शिवांगी जयशंकर सिंह (वय 21, रा. उज्ज्वलनगर, माळेगाव, एम. आय. डी. सी., ता. सिन्नर) असे पाण्यात पडून मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. शिवांगी ही काल (दि. 20) तिचा मित्र आदित्य नरेंद्र देवरे याच्यासमवेत सोमेश्वर धबधबा येथे आली होती.
- निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..
- Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू
त्यावेळी मित्रासमवेत फोटो काढत असताना ती पाय घसरून धबधब्याच्या पाण्यात पडली. तिला आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याबाहेर काढले. तिचा भाऊ हिमांशू जयशंकर सिंह याने तिला औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.