नाशिकमध्ये दोन गटांत तुफान राडा; दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न
नाशिक (प्रतिनिधी): बजरंगवाडीमध्ये वर्चस्वाच्या वादातून महादेव मंदिराजवळ दोन गटात तुफान हाणामारी झाली. सदर घटना बुधवारी (ता.१५) रात्री घडली. यात दोन युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात दोन्ही गटातील संशयितांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक बाळू गिते यांच्या फिर्यादीनुसार, बजरंगवाडी परिसरात बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली. परिसरातील वर्चस्वाच्या वादातून संशयित मंगेश हिरामण जाधव व संकेत ऊर्फ दाद्या तोरवणे यांच्यात संघर्ष सुरू होता.
- Big Breaking: नाशिक शहर: पतीने केले पत्नीवर धारदार शस्त्राने वार; त्यानंतर पतीचा गूढ़ मृत्यू…
- नाशिक: किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू
मंगेश जाधव यास संकेत तोरवणे, चेतन जाधव, अभिषेक ब्राह्मणे, रोहन ऊर्फ मोनू शर्मा व त्यांच्या साथीदारांनी मारहाण केली. या घटनेत मंगेश गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी गर्दीला पांगविण्यास सुरवात केल्यानंतर दोन्ही गटातील संशयितांनी एकमेकांवर दगडफेक करीत मारहाण सुरू केली. यात विशाल सोमनाथ गाढवे जखमी झाला. विशालच्या डोक्यात संशयित संकेतने कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
मंगेश व विशालवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाच्या दगडफेकीत स्थानिकांच्या घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी जमाव पांगवत संशयितांची धरपकड केली. यात संकेत तोरवणे गटातील १४, तर मंगेश जाधव गटातील १३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.