नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: दिड वर्षाच्या पोटच्या मुलीला गळफास देवून आईची आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): वणी येथील मोठा कोळीवाडा येथे माहेरी राहात असलेल्या महिलेने आपल्या दिड वर्षाच्या मुलीला घराच्या अडगळीला स्कार्फच्या सहाय्याने गळफास लावुन स्वतःही अडगळीस साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
येथील मोठा कोळीवाडा येथे सविता विकास कराटे, वय-३३ रा. कृष्णगांव ही मुलगी तनुजा विकास कराटे, वय दिड वर्ष हीच्यासह माहेरी आई सोबत राहत होती.
सविताची आई गावाला गेलेली असल्याने दोघीच माय लेकी घरात असतांना, आज ता. १४ मार्च रोजी सकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान नळाला पाणी आल्याने सविता हिचा भाचा त्यांना उठवायला आला.
दरवाजा वाजवून कोणी उठत नाही लक्षात येताच त्याने फोन करुन पाहिला, तोही उचलत नसल्याने दाराच्या फटीतून पाहिले असता दोन्हीही गळफास घेतलेल्या आवस्थेत दिसल्या. याने हा प्रकार त्याचे वडील उत्तम पुंडलिक इंगळे यांना माहीती देत. त्यांनी हा प्रकार बघून वणी पोलीस ठाण्यात कळविले.
दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी झालेल्या प्रकाराची चौकशी करत पंचनामा केला. दोन ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येवून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.निलेश बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.
सविता कराटे हीचे तीसरे लग्न झालेले होते व मागच्या आठवड्यातच तीच्या पती समवेत काडीमोड झाला होता. तीन वेळेस लग्न होऊनही संसार टिकत नाही, या मानसिक विवंचनेतुन पोटच्या मुलीला गळफास देऊन स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबत अधिक तपास सुरू आहे.
8 Total Views , 2 Views Today