नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार!
नाशिक (प्रतिनिधी): राज्याच्या अर्थसंकल्पात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात मांडण्यात आली असून त्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. मुलगी सज्ञान झाल्यानंतर मुलीला रोख 75 हजार रुपये देण्यात येतील.
या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना याचा लाभ मिळणार आहे.
- पंचवटी: चौथ्या मजल्यावरून पडल्याने ४१ वर्षीय इसमचा मृत्यू
- Breaking: इगतपुरीजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्याचं स्वागत केलं.
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत
- मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 रुपये
- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
- अकरावीत 8000 रुपये
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
![]()


