नाशिकमधील ‘या’ हॉटेलच्या हुक्का पार्लरवर छापा.. मालक व मॅनेजरला अटक

Ad: Latest Job Openings in Nashik City.

नाशिकमधील “या” हॉटेलच्या हुक्का पार्लरवर छापा.. मालक व मॅनेजरला अटक

नाशिक (प्रतिनिधी): अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने इंदिरानगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर कारवाई करत हुक्क्यासाठी वापरले जाणारे साहित्य जमा करत हॉटेल मालकावर कारवाई केली…

याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

यावरून सदर पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल द पेरू फार्म इंदिरानगर येथे अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु आहे. यावरून पोलीस पथकाने हॉटेल पेरू येथे छापा टाकत हुक्का पॉट,हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

Ad: नाशिकला रेडीपझेशन 2BHK टेरेस फ्लॅट विकणे आहे.

तसेच हॉटेल मालक शंकर राजाराम पांगरे (३०,रा. टाईम्स ब्लॉसम अपार्टमेंट चौथा मजला,पांगरे मळा बडदे नगर,नाशिक) व हॉटेलचा मॅनेजर नितीन शांताराम आहिरे (२६,रा.पेरूचा बाग,इंदिरानगर) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,सहायक आयुक्त वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हेमंत नागरे, हवालदार भामरे, डंबाळे, कोल्हे, भालेराव, दिघे, नांद्रे, येवले, कुटे, बागडे, फुलपगारे, दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक गांगुर्डे, अंमलदार सूर्यवंशी, सवळी, जोशी, महिला पोलीस शिपाई मल्लाह आदींच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790