नाशिक: प्रॉपर्टीच्या वादातून एकाचा खून; सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी!

नाशिक: प्रॉपर्टीच्या वादातून एकाचा खून; सख्खा भाऊच निघाला पक्का वैरी!

नाशिक (प्रतिनिधी): मखमलाबाद शिवारात अपघाताचा बनाव रचत सख्या भावाचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हा खून प्रॉपर्टीच्या वादातून एकाचा खून झाला असल्याचे आता उघड झाले आहे.

या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीस वर्षीय ज्ञानेश्वर साहेबराव कराड आपल्या कुटुंबा समवेत , गंगापूर कॅनाल जवळ, नर्सरी समोर, कराड मळा, मखमलाबाद गाव येथे राहत होते.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

गुरुवार (ता.१२) रोजी आई लंकाबाई साहेबराव कराड यांनी लहान मुलगा दिपक यास फोन करून सांगितले की, रात्री ज्ञानेश्वर घरी पोहोचले नाही. दिपक हा मळ्या कडे जाणाऱ्या रस्त्याने शोध घेत असता, ज्ञानेश्वर दुचाकी सह गायकवाड मळ्यासमोर पाटात पडलेले आढळून आले. त्यांच्या डोक्यात गंभीर मार लागून रक्तस्त्राव होऊन मयत झाल्याचे दिसले. ही खबर म्हसरूळ पोलिसांना दिली, या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

परंतु याबाबत अपघात की घात पोलिसानी संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने तपास केला असता, हा अपघात नसून खून असल्याचे समोर आले असून दिपक कराड याने इतर साथीदारांच्या मदतीने हा खून केला आहे. दिपक कराड सह दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.. या प्रकरणी वंदना ज्ञानेश्वर कराड यांनी म्हसरूळ पोलिस याबाबत फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित दीपक साहेबराव कराड, खंडू निवृत्ती सानप आणि रवींद्र पिंपरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १३/२०२३, भारतीय दंड विधान: ३०२)

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रेयसीच्या पतीचा खून करून फरार झालेल्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक !

खुनाचं नेमकं कारण…
मखमलाबाद शिवारात पाटालगत साहेबराव कराड यांनी १०२ गुंठे जमीन पहिल्या पत्नीच्या नावाने खरेदी केली, यातील दहा गुंठे जमीन विकून मुलगा दिपकला फ्लॅट खरेदी करून दिला होता. उर्वरित जमिनी पैकी तर ४० गुंठे जमीन दुसऱ्या पत्नीच्या नावावर, ५२ गुंठे जमीन पहिल्या पत्नीच्या नावावर ठेवली होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: भरधाव मोटारसायकलच्या धडकेत २४ वर्षीय युवतीचा मृत्यू

दिपकने सावत्र आईच्या अडाणीपणाचा फायदा घेत, ५२ गुंठे जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती. परंतु ही जमीन कष्टार्जित असल्याने फसवणुकीचा बाबत सावत्र आईने न्यायालयात दावा दाखल करून जमीन परत मिळविली. यासाठी ज्ञानेश्वर यांनी मदत केली होती.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here