🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: अंबडला भररस्त्यावर माथेफिरुचा धिंगाणा; सिटीलिंक बसवर दगडफेक

नाशिक: अंबडला भररस्त्यावर माथेफिरुचा धिंगाणा; सिटीलिंक बसवर दगडफेक

नाशिक (प्रतिनिधी): मंगळवारी (ता. १०) रात्री सिम्बॉयसिस कॉलेज या ठिकाणाहून नाशिकरोडकडे प्रवासी घेऊन जाणारी सिटीलिंक बस (एमएच- १५- जीव्ही- ७७४८) सावतानगर बस स्टॉप येथे उभी होती.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी ध्वजस्तंभ व पताका रचना आढावा बैठक

या वेळी अचानक बसला भररस्त्यात अडवून एका माथेफिरूने चालकाला शिवीगाळ करीत थेट बसवर दगडफेक करीत बसची तोडफोड केली. या प्रकारामुळे चालक, वाहक व प्रवाशांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले.

भाजप पदाधिकारी ॲड. अतुल सानप यांनी तत्काळ पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत संशयितास ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  णमोकार तीर्थ महोत्सव: प्रशासकीय विभागांनी सुरक्षिततेची सर्वतोपरी दक्षता घ्यावी- डॉ. प्रवीण गेडाम

याप्रकरणी सिटीलिंक बसचालक सचिन दिलीप गायकवाड (३५, जयभवानी रोड) यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अंबड पोलिसांनी संशयित अतुल महादू देवरे (२६, रा. सावतानगर, सिडको) यास अटक केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी जन्मोत्सवानिमित्त आज (दि. ३१) शहरातील 'या' वाहतूक मार्गात बदल

राणाप्रताप चौकात घरात घुसून पाच गावगुंडांनी दोघांना मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा सावतानगर सारख्या रहदारीच्या रस्त्यावर माथेफिरू थेट बसवर दगडफेक करत असल्याने या गावगुंडांवर पोलिस प्रशासनाचा धाकच उरला नसल्याच्या संताप जनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790