नाशिक: सिटी सेंटर मॉलजवळ दुचाकी झाडावर धडकून दोन युवक ठार

नाशिक: सिटी सेंटर मॉलजवळ दुचाकी झाडावर धडकून दोन युवक ठार

नाशिक (प्रतिनिधी): ट्रीपल सीट मोटारसायकल झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना एबीबी सर्कलनजीक घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष पोलीस महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ; दत्तात्रय कराळे यांची बदली

याबाबत गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार विजय खैराते यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी विशाल संजय मराठे (वय २०, रा. मु. पो. अक्‍कलकुवा, जि. नंदुरबार) हा त्याच्या ताब्यातील एमएच १५ जीपी ६२०४ या क्रमांकाची मोटारसायकल काल एबीबी सर्कलकडून सिटी सेंटर मॉलकडे ट्रीपल सीट जात होता. ही भरधाव मोटारसायकल लक्षिका लॉन्सच्या समोर दुभाजकाजवळ असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंचवटीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीला 'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा !

या अपघातात दुचाकीचालक विशाल मराठे याच्यासह मागे बसलेला विष्णू प्रमोद जोशी (वय १८) हे दोघे जण ठार झाले, तर त्यांचा तिसरा साथीदार हर्षल रवींद्र शिरसाठ (वय २२, रा. श्रमिकनगर, सातपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790