महामार्गावर नाशिक पोलिसांच्या वाहनाला अपघात; तीन पोलीस कर्मचारी जखमी
नाशिक (प्रतिनिधी): मंडलिक, रम्मी राजपूत गुन्ह्या प्रकरणी अॅफिडेविट कोर्टात नेणाऱ्या पोलीस वाहनाचा विचित्र अपघात झाला आहे.
न्यायालयीन कामानिमित्त नाशिक हुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पोलिस वाहनाला महामार्गावरील गोंदे जवळ अपघात झाला तिहेरी अपघातामध्ये पोलीस वाहनाने तीन पलट्या घेत अपघात होऊन तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे सदरचा अपघात बुधवारी सकाळी घडला.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा सकाळी अपघात झाला. पोलिसांचे वाहन तीन वेळेस उलटले असून, तीन वाहने एकमेकांना आदळली. संतोष भगवान सौंदाणे ( ५७), सचिन परमेश्वर सुपले (४३), रविंद्र नारायन चौधरी (३७) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हा शाखेचे हे कर्मचारी आहेत.
![]()


