धक्कादायक! सिडकोतील पेठे शाळेत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील सिडको परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानिमित्ताने अल्पवयीन मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
उंटवाडी येथील माध्यमिक शाळेत पीटीच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे.
विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार शाळेतच घडला आहे. याची गंभीर दखल घेत पीटी शिक्षकाविरुद्ध अंबड पोलिस स्टेशनमध्ये पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनीच्या पालकांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार, पाटीलनगर येथील पेठे विद्यालयात हा प्रकार घडला आहे.
गेल्या ६ जानेवारी रोजी सिडकोच्या पेठे विद्यालयात दुपारी दोन वाजता ही घटना घडली. शारीरिक शिक्षण (पीटी) विषयाचा शिक्षक रविंद्र नाकील याने पिडीत विद्यार्थिनीसोबत अधिक जवळीक साधली. तसेच, तिच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकारानंतर या विद्यार्थिनीने घरी जाऊन ही सर्व बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पालकांनी पोलिसांना तक्रार दिली. त्यानुसार, शिक्षक रविंद्र नाकील याच्याविरुद्ध पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक पावरा अधिक तपास करीत आहेत.
![]()


