Breaking: सिन्नर घोटी महामार्गावर चालत्या ट्रकला आग
नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर घोटी महामार्गावर घोरवड घाटात मंगळवारी (ता. १०) सकाळी चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याने महामार्गावर एकच धावपळ उडाली. आग लागल्याने संपूर्ण ट्रक हा काही तासाच्या अवधीतच जळून खाक झाला.
सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाला लागलीच पाचारण करण्यात आले, यावेळी अग्निशामक कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच एमआयडीसी अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
या ट्रकमध्ये प्लॅस्टिक असण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. आटोक्यात आणण्यासाठी लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, लक्ष्मण सोनकुसरे, जयेश बोरसे आदींनी प्रयत्न केले. हा ट्रक (क्रमांक एम एच 48 बी एम 16 76( घोटीहून सिन्नरच्या दिशेने जात असल्याचे समजते. ट्रकच्या आगीने क्षणार्धात रुद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक जळून खाक झालेला होता.